*खामगाव पं. स. अंतर्गत येणाऱ्या सर्व ग्रामपंचायत मध्ये विकास कामाचे फलक लावावे अशी मागणी भूमी मुक्ती मोर्चा
व बहुजन मुक्ती मोर्चा च्या वतीने केली आहे* खामगाव: तालुक्यातील पंचायत समिती मार्फत अनेक विकास कामे घडून आणल्या जातात, परंतु या विकास कामांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे ही अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे ज्या गावात विकास कामे सुरू आहेत त्याची संपूर्ण माहिती ही नागरिकांपर्यंत पोहोचली पाहिजे यासाठी तालुक्यातील जिल्हा परिषद अंतर्गत, पंचायत समिती अंतर्गत विविध योजनेतून ज्या ज्या ग्रामपंचायत अंतर्गत विकास कामे सुरू आहेत तेथील विकास कामे नाम फलक लावणे ही त्या त्या ग्रामसेवकाची जबाबदारी आहे परंतु अधिकारी यात
टाळाटाळ करून फलक लावत
नाहीत व नागरिकांना माहिती मिळत नाही म्हणून सरकारी कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारची विकास कामे सुरू असतील योजना स्थानिक प्रशासन राबवत असेल अशा ठिकाणी नाम फलक लावले पाहिजे ही एक जबाबदारी अधिकाऱ्याची आहे. तरी आमची ही मागणी गांभीर्यपूर्वक असून लवकरात लवकर कार्यवाही व्हावी. असे निवेदन भूमी मुक्ती मोर्चा बहुजन मुक्ती मोर्चा खामगाव तालुका यांच्या
वतीने गटविकास अधिकारी पंचायत समिती खामगाव यांना देण्यात आले. सदर निवेदनावर भाई महेंद्र खंडारे (भूमी मुक्ती मोर्चा ता. कार्याध्यक्ष तथा बहुजन मुक्ती मोर्चा ता. अध्यक्ष खामगाव), गौतम जाधव (तालुका उपाध्यक्ष), विजय इंगळे ( तालुका संघटक), एकनाथ तायडे, राजेंद्र जाधव, सुनील सदाशिव, सुरेश ठोंबरे व आदी कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.

Post a Comment
0 Comments