धुळे; सराईत गुन्हेगारांना पोलिसांचा इशारा; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिस्ट्रीशिटर्सची झाडाझडती
धुळे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी धुळे पोलीस प्रशासन पूर्णपणे ‘ॲक्शन मोड’मध्ये आले आहे. निवडणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सराईत गुन्हेगारांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
गुन्हेगारी प्रतिबंध कार्यशाळा
शहरात 10 किंवा त्यापेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या हिस्ट्रीशिटर्सना आज पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावून त्यांची थेट हजेरी घेण्यात आली. यावेळी त्यांची सखोल चौकशी करत भविष्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कायदा भंग केल्यास कठोर कारवाईचा सज्जड इशारा देण्यात आला.
निवडणुकीच्या काळात दादागिरी, धमकी, शांतता भंग किंवा गुन्हेगारी कारवाया केल्यास संबंधितांवर ‘मोक्का’, ‘एमपीडीए’ तसेच तडीपारीसारखी कडक कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.
याशिवाय सोशल मीडियावरून अफवा पसरवणे, आक्षेपार्ह पोस्ट, व्हिडीओ किंवा भडक मजकूर प्रसारित करणाऱ्यांवर सायबर सेलची विशेष नजर राहणार असून अशा प्रकरणात तात्काळ कारवाई केली जाईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केल

Post a Comment
0 Comments