Type Here to Get Search Results !

भोटा येथे चोरट्याचा घरफोडीचा डाव; १.२५ लाखांचा मुद्देमाल नगदीसह गायब

 भोटा येथे चोरट्याचा घरफोडीचा डाव; १.२५ लाखांचा मुद्देमाल नगदीसह गायब


(ग्रामीण पत्रकार संदिप देवचे 


जलंब , दि. २७ डिसेंबर २०२५  ग्राम भोटा येथे शेतकरी शंकर श्रीकृष्ण पारसकर यांच्या घरी शुक्रवारी (२६ डिसेंबर) दुपारी १०.३० ते ३.३० या वेळेत अज्ञात चोरट्याने घरफोडी करून ९०,००० रुपयांची नगदी आणि ५ ग्रॅमची सोन्याची जुनी अंगठी (किंमत अंदाजे ३५,००० रुपये) चोरून नेली. एकूण १ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल गायब झाल्याने पोलिसांकडे फिर्याद नोंदवली असून, तपास सुरू आहे.फिर्यादीनुसार, घरातील सदस्य कामानिमित्त घराला कुलुप लावून बाहेर पडले असताना चोरट्याने मागील खोलीच्या दरवाज्याची कळ दरवाज्याच्या फटीतून हात घालून उघडली. त्यानंतर लोखंडी कपाटातील लॉकर तोडून मुद्देमाल लंपास केला. संध्याकाळी ९ ते १० या वेळी शंकर पारसकर यांनी जलंब पोलिस स्टेशनला तोंडी रिपोर्ट दिला. याप्रकरणी अपराध क्रमांक ३००/२०२५ अंतर्गत कलम ३३१(३), ३०५(अ) भा.द. कलमांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ठाणेदार साहेबांच्या आदेशाने पीएसआय देव साहेब तपास करीत आहेत. घटनास्थळाची पाहणी करून पुरावे गोळा केले जात आहेत. स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी चोरट्याच्या शोधासाठी पथक नेमले असून, सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत.

Post a Comment

0 Comments