Type Here to Get Search Results !

सुरजभैय्या यादव यांचा प्रामाणिक पणा सापडलेला मोबाईल केला परत*



*सुरजभैय्या यादव यांचा प्रामाणिक पणा सापडलेला मोबाईल केला परत*



खामगांव :- एकनिष्ठा गौ सेवा रक्तसेवा फाउंडेशन संस्थापक सुरजभैय्या यादव हे नेहमी प्रमाणे सामान्य रुग्णालय खामगांव येथे गरजू रुग्णाला रक्ताची मदत करण्यासाठी गेले असता त्यांना काल दिनांक 24 डिसेंबर 2025 रोजी शासकीय ओपीडी मध्ये सकाळी 11:30 वाजता मोटोरोला कंपनीचा नवीन मोबाईल फोन अंदाजे 11,000 हजार रुपये किंमतीचा मिळाला त्यांनी मोबाईल धारकाचा सर्वत्र शोध घेतला त्या फोन वर एका तासा नंतर फोन आला मि गजानन शेटे बोलतो खामगांव येथील भैय्युजी महाराज प्रेरित सूर्योदय पारधी आदिवासी आश्रम शाळा अधीक्षक आज सामान्य रुग्णालयात आश्रम शाळेचे काही विद्यार्थी यांना घेऊन आलो होतो माझा हा फोन हरवलेला आहे तुम्ही कोण बोलता असे विचारताच एकनिष्ठा गौ सेवा रक्तसेवा फाउंडेशन अध्यक्ष सुरजभैय्या यादव बोलतो तुमचा मोबाईल फोन माझ्या जवळ आहे तुम्ही मला प्रत्यक्ष भेटून तुमचा फोन घेऊन जा तुमचा फोन सुरक्षित आहे गजानन शेटे सर यांना नर्मदेश्वर शिव मंदिर सतीफैल येथे त्यांच्या स्वाधीन फोन देऊन सुरजभैय्या यादव यांनी पुन्हा एक दा माणुसकीचे दर्शन घडविले. 



Post a Comment

0 Comments