धुळे महानगरपालिकेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा, धुळे तसेच आझादनगर, देवपूर, पश्चिम देवपूर आणि मोहाडीनगर पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने अवैध धंद्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे.
दि. 25 डिसेंबर 2025 रोजी करण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत गावठी हातभट्टी दारू तयार व विक्री करणाऱ्यांवर छापे टाकण्यात आले. या कारवाईत एकूण 11 गुन्हे दाखल करण्यात आले असून 11 आरोपींविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे.
गावठी हातभट्टी दारूवर कारवाईचा
या संयुक्त कारवाईत तब्बल 622 लिटर गावठी हातभट्टी दारू, रसायने, वॉश, ड्रम व दारू तयार करण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. जप्त केलेला सुमारे 45 हजार 450 रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळीच नष्ट करण्यात आला.
आझादनगर पोलीस ठाणे : 1 गुन्हा – 270 लिटर
देवपूर पोलीस ठाणे : 5 गुन्हे – 122 लिटर
पश्चिम देवपूर पोलीस ठाणे : 3 गुन्हे – 180 लिटर
मोहाडीनगर पोलीस ठाणे : 2 गुन्हे – 50 लिटर
जुगार अड्ड्यांवरही छापे
याच मोहिमेदरम्यान देवपूर व पश्चिम देवपूर पोलीस ठाणे हद्दीत 5 जुगार अड्ड्यांवर छापे टाकण्यात आले. यामध्ये 5 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून 5,100 रुपयांची रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

Post a Comment
0 Comments