Type Here to Get Search Results !

केसगळती व्हायरसने बाधित झालेल्या सर्व गावातील रुग्णांना आर्थिक मदत रोख रक्कम त्याचे खात्यामध्ये जमा करून जीवनावस्याक खाद्यपदार्थ वस्तूची रेशन किट घरोघरी वाटप करून लवकर उपचार करा शिवसेना खामगांव तालुका ऊबाठा 🚩

 केसगळती व्हायरसने बाधित झालेल्या  सर्व गावातील रुग्णांना आर्थिक मदत रोख रक्कम त्याचे खात्यामध्ये जमा करून  जीवनावस्याक खाद्यपदार्थ वस्तूची रेशन किट घरोघरी वाटप करून लवकर उपचार करा  शिवसेना खामगांव तालुका ऊबाठा 🚩       



                                                                           (सिध्देश्वर निर्मळ खामगांव )                                     शिवसेना (ऊं बा ठा )व शिव आरोग्य सेना यांचे वतीने बुलढाणा जिल्ह्यातील खामगांव विधानसभा क्षेत्रातील  बोडगाव  कालवड कठोरा  माटरगाव पहूरजिरा भोनगाव मच्छिन्द्रखेड निंबी व इतर सर्व गावातील दोनशे च्या वर केसगळती व्हायरस बाधीत रुग्णांना त्यांना धीर देण्यासाठी भेटी दिल्या असता  देशातील तज्ञ् डॉक्टरांची टीम त्याचे निदान करत असून त्याचे रक्ताचे नमुने घेऊन तेथील पानी माती ज्वारी व इतर आवश्यक वस्तूचे नमुने घेऊन त्यांचे निदान करत आहेत परंतु शासनाचे वतीने या केसगळती रुग्णाचे अजून निदान लागलेले नाही व किती दिवसात हे निदान होईल हे सुद्धा सांगता येत नाही केसगळती व्हायरस हा संसर्ग असून रुग्णांच्या संपर्कात आले असता ते आपल्याला ही होईल असा संभ्रम व गैरसमज सर्व ग्रामस्थांमध्ये असल्यामुळे त्याचा संपर्क येऊ नये म्हणून बाधित रुग्णांचे सर्व कामधंदे मजुरी  पचवीस दिवस झाले बंद झाले आहे जवळ जवळ सर्वच रुग्ण हे गरीब कुटुंबाततले असून मोल मजुरीवर  त्यांचा उदर निर्वाह आहे त्यामुळे त्याच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे  माता भगिनीचे केस गळल्यामुळे त्यांना घराबाहेर निघणे कठीण झाले आहे लहान मुलांना शाळेत जाणे कठीण झाले आहे  या धास्ती मुळे कुणीही त्यांना मजुरी व कामधंद्याला सांगत नाही शिवसेनेच्या वतीने आमची केसगळती बाधित रुग्णासाठी अशी मागणी आहे की शासनाकडे केसगळती बाधित रुग्णचा त्याचे नावासहित  घरासहित सर्वे केलेला आहे त्याचा या सर्व गोष्टीचा विचार करून सरकारने बाधित रुग्णच्या बँक खात्यात आर्थिक रोख रक्कम जमा करावी  जोपर्यंत निदान लागत नाही तोपर्यंत त्यांना जीवनावस्यक  खाद्यपदार्थ वस्तूची रेशन किट  बाधित रुग्णचा घरोघरी वाटप करावी शुद्ध पिण्याचे पान्याची वव्यस्था करावी आम्हाला असे निदर्शनात आले की गावातील पानी खराब आहे या भीतीमुळे त्यांनी बरेच दिवस झाले आंघोळ केली नाही त्यामुळे त्वचा रोग संबंधित आजार होऊ नये म्हणून आंघोळी साठी व वापरण्याकरिता फिल्टर पाण्याची व्य्वस्था करावी देशातील डॉक्टर यांचे कडून निदान होत लागत नसेल तर जागतिक आरोग्य सेवेची मदत घेऊननिदान करून केसगळती हा व्हायरस थांबवावा अन्यथा एका जिल्हातून संपूर्ण महाराष्ट्रात व देशभर हा केसगळती व्हायरस पसरल्या शिवाय राहणार नाही याकरिता शिवसेना खामगांव तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या व शिव आरोग्य सेनेच्या  वतीने  बाधित रुग्णांना मदतीची आमची जनहितार्थ मागणी ताबडतोब पुर्ण करावी याकरिता हे निवेदन देत आहोत यासाठी भिकूलाल जैन विधानसभा समन्व्यक शिव आरोग्य सेना जिल्हा समन्व्यक.तालुका प्रमुख श्रीराम खेलदार विधानसभा संघटक विजय बोदडे सुभाष ठाकूर गजानन होगे उपतालुका प्रमुख गजानन माने उपशहर प्रमुख विक्की जैन महिला आघाडी उर्मिला ताई ठाकरे  तालुका महिला प्र श्रुतीताई पतंगे शहर प्रमुख बबिता ताई हट्टेल नंदाताई दुबे पल्लवीताई पाटील मायाताई इंगळे चंदाताई जाधव कल्याणीताई वाघ ज्ञानदेव रोठे किशोर भूतकर प्रकाश टेरे गजानन धंदरे दीपक काबळे शुभम बावस्कार गणेश घोराडे धम्मपाल दामोदर सोहन हिवराळे सर्व शिवसेना शिव आरोग्य सेना पदाधिकारी शिवसैनिक हजर होते

Post a Comment

0 Comments