Type Here to Get Search Results !

रोहिणखेड चे सरपंच हरवले बॅनर लावून शोध सुरू*

 *रोहिणखेड चे सरपंच हरवले

बॅनर लावून शोध सुरू* 

(संभाजी हाडे मोताळा प्रतीनिधी)




मोताळा तालुक्यातील ग्राम रोहिणखेड चे सरपंच हरवले आहेत बीड मधील संतोष देशमुख प्रकरण तसेच लातूर मधील सरपंच मारहाण प्रकरण या प्रकरणानंतर राज्यामध्ये सर्वत्र सरपंच पदाकडे लक्ष केंद्रित झालेले आहे सरपंचांच्या बाबतीत कुठेही काहीही झालं तरी आता सर्वांचेच कान टवकारले जातात म्हणून रोहिणखेडच्या सरपंच हरवले आहे, अशी बातमी समोर आल्यानंतर खडबड तर उडणारच. रोहिणखेडच्या सरपंच भानुदास हुंबड हरवले आहेत असा एक फ्लेक्स रोहिणखेडच्या बस स्टैंड वर झळकला आहे. खरंच डॉक्टर हुंबड हरवले आहेत का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे परंतु याच बॅनरने हे प्रकरण पुढे काय आहे याचा उलगडा केला आहे. वास्तविक, सरपंच हरवले आहे , हे बॅनर सरपंचांच्या कार्यशैली विरोधात होते. कारण पुढचे वाक्य होते की शोधून आणून देणाऱ्यास 20 पैशांचे बक्षीस देण्यात येईल खाली त्रस्त गावकरी असे लिहिले आहे. अर्थातच सरपंच यांच्या विरोधातील हे उपरोधिक बॅनर होते. हे बॅनर ग्रामपंचायत कर्मचारी गणेश भोपळे यांनी काढून टाकल्याची माहिती आहे परंतु बस स्टैंड वर खुलेआम लावलेले हे बॅनर दिवसभर चर्चेचा विषय ठरले गावातील घाण कचरा आणि नाल्यांचे दुरावस्था याला घेऊन सदर बॅनर लावण्यात आले होते. सरपंच या समस्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याची ओरड नागरिकांची आहे म्हणून कोणी अज्ञानाने हे बॅनर लावले आहे ते सुद्धा अशा ठिकाणी लावले ज्या ठिकाणी सर्वत्र कचराच कचरा होता. आता संबंधित ठिकाणी बॅनर नाही, परंतु बॅनर काढणाऱ्यांनी कचरा स्वच्छतेची विल्हेवाट का लावली नाही ? असा सवाल ही उपस्थित केला जात आहे या संदर्भात सरपंच डॉ. हुंबड यांची प्रतिक्रिया काय असेल हे कळेलच .

Post a Comment

0 Comments