Type Here to Get Search Results !

शिर्ला नेमाने येथील गायकवाड परिवाराचा आदर्श स्तुत्य उपक्रम:*

 *शिर्ला नेमाने येथील गायकवाड परिवाराचा आदर्श स्तुत्य उपक्रम:*





*खामगाव :-* तालुक्यातील स्थानिक शिर्ला नेमाने येथील अनुप गजाननराव गायकवाड यांनी आपल्या मुलीचा प्रथम वाढदिवस अतिशय साध्या व सुंदर अशा पद्धतीने साजरा केला.

आज बदलत्या फॅशन व बदलते वाढदिवसाच्या फॅड वाढत असताना अनेक लोक पैशाची उधळण करून पैसा व्यर्थ खर्च करतात. अनेक आलिशान हॉटेल तर कुणी वाढदिवसाला फटाक्यांची आतिशबाजी करतांना दिसतो. खामगाव तालुक्यातील शिर्ला नेमाने येथील सुशिक्षित तरुण,पेशाने शिक्षक असणारे श्री अनुप गायकवाड सर यांनी आपल्या मुलीचा , (हिंदवी चा) वाढदिवस गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून साजरा केला.  

या स्तुत्य उपक्रमाचे गावातील सुजान नागरिकांनी  व शाळेच्या मुख्याध्यापकांनी भरभरून कौतुक केले . गरीब मुलांच्या चेहऱ्यावर हसू पाहताना गायकवाड परिवार आनंदी झाला होता.

      सदर साहित्य वाटप करताना  जागृती शिक्षण संस्थेचे व्यवस्थापक  श्री केशव भाऊ पेसोडे मुख्याध्यापक लांडे सर, उपमुख्याध्यापक राठोड सर व इतर शिक्षक वर्ग उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments