ग्रामसेवा समिती रोहिणखेड तर्फे संभाजी हाडे यांच्या सत्कार समारंभाचा जल्लोषपूर्ण सोहळा
(मोताळा प्रतीनीधी)
मोताळा: शिवशंभू मर्दानी आखाड्याचे संस्थापक अध्यक्ष तसेच समाजसेवक संभाजी हाडे यांच्या समाजकार्याचा गौरव करण्यासाठी भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. हा सोहळा आज ग्रामसेवा समिती रोहिणखेड द्वारा संचालित नवजीवन विद्यालय रोहिणखेड येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
संभाजी हाडे यांनी ग्रामीण भागातील स्वसंरक्षण , शिक्षण यासह अनेक सामाजिक आणि धार्मिक उपक्रमांमध्ये अमूल्य योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत, ग्रामसेवा समिती रोहिणखेड यांनी त्यांचा सन्मान केला.
ग्रामसेवा समितीचे सचिव सुनील एन्डोले यांनी संभाजी हाडे यांच्या कार्याचे कौतुक केले तर ज्येष्ठ शिक्षक पी पी तायडे यांनी आपल्या भाषणात संभाजी हाडे यांच्या कार्याचे कौतुक करत, त्यांना समाजातील आदर्श व्यक्तिमत्त्व असे संबोधले.
सत्कार सोहळ्यादरम्यान, हाडे यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देण्यात आले. यावेळी ते म्हणाले, "हा सन्मान केवळ माझाच नसून, माझ्यासोबत काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आहे. माझे जीवन समाजसेवेसाठीच आहे."
कार्यक्रमाचे संयोजन ग्रामसेवा समिती द्वारा संचालित नवजीवन विद्यालय रोहिणखेड यांच्यावतीने करण्यात आले. या प्रसंगी वल्ले सर यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाला स्थानिक नागरिक, समाजसेवक आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थितांनी संभाजी हाडे यांच्या कार्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि कार्यक्रमाचे कौतुक केले.
- प्रतिनिधी

Post a Comment
0 Comments