पत्रकारांच्या घराचा प्रश्न मार्गी लावणार - आमदार गायकवाड
खामगाव (का.प्र.)- व्हाईस ऑफ मीडियाचे काम अत्यंत उल्लेखनीय आहे. पत्रकारांसाठी ज्या पद्धतीने व्हाईस ऑफ मीडिया काम करत आहे ते कौतुकास्पद आहे. पत्रकार समाजातील वंचित घटकांच्या व्यथा प्रशासनासमोर मांडत असतो, पत्रकारांच्या जीवनात अनेक संकटे आणि अडचणी असतात, त्या मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. बुलढाण्यातील पत्रकारांच्या घराचा प्रश्न देखील लवकरच मार्गी लावणार असून त्या अनुषंगाने पुढच्याच आठवड्यात महत्त्वाची बैठक होणार आहे असे प्रतिपादन बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी केले.
जिल्हा कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा व
आमदार संजय गायकवाड यांच्या पुढाकारातून जिल्हाभरातील पत्रकारांचा विमा पॉलिसी वितरण सोहळा बुलढाणा येथील जिल्हा पत्रकार भवनाच्या प्रांगणात पार पडला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी मंचावर व्हाईस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के,
चॉईस ऑफ
राज्य संघटक सुधीरजी चेके, राज्य कोअर कमिटी सदस्य अरुण जैन, सिद्धेश्वर पवार, विदर्भ संघटक सिद्धार्थ आराख, राज्य कार्यवाहक लक्ष्मीकांत बगाडे, विभागीय कार्याध्यक्ष अजय बिल्लारी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments