श्रीसंत गजानन महाराज निवासी मतिमंद शाळेत अन्नातून विषबाधा: एकाचा मृत्यू, 12 जणांची प्रकृती गंभीर.
शेगाव-बाळापूर रोडवरील श्री संत गजानन महाराज निवासी मतिमंद शाळेत मंगळवारी विद्यार्थ्यांना दिलेल्या अन्नातून विषबाधा झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या दुर्दैवी घटनेत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून, 12 जणांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेने पालकवर्ग व नागरिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.घटनेचा तपशील:वार 12 जानेवारी रोजी शाळेतील विद्यार्थ्यांनासंध्याकाळी नियमित भोजन दिले गेले. काही वेळाने विद्यार्थ्यांना उलट्या, मळमळ, पोटदुखी आणि अशक्तपणाच्या तक्रारी जाणवू लागल्या. लगेचच विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, एका विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर 12 जणांना रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात हलविण्यात आले आहे. यापैकी दोघा विद्यार्थ्यांना अकोला येथे रेफर करण्यात आलेप्रशासनाचा ढिसाळपणा:घटनेनंतर जिल्हा आरोग्य अधिकारी वआरोग्य अधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी हे शाळेची पाहणी करण्यासाठी घटनास्थळी पोहोचले. यावेळी शाळेच्या प्रशासनाकडून परिस्थिती लपविण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांकडूनही उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत असून, तपास यंत्रणांना सहकार्य करण्यात आले नसल्याचे निदर्शनास आले आहे.संदिग्ध अन्नाची तपासणी सुरू:घटनेनंतर विद्यार्थ्यांना दिल्या गेलेल्या अन्नाचे नमुने ताब्यात घेऊन त्यांची रासायनिक तपासणी करण्यात येत आहे. अन्नात कशा प्रकारे विषबाधा झाली, याचा सखोल तपासझाली, याचा सखोल तपास करण्यात येत आहे.पालकांचा आक्रोश:या घटनेमुळे पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. शाळेच्या प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची योग्य काळजी घेतली नसल्याचा आरोप पालकांनी केला आहे. “आमच्या मुलांचे जीव धोक्यात आहेत. प्रशासनाचा हलगर्जीपणा मुळे आमच्या मुलांवर ही वेळ आली आहे,” असे पालकांनी सांगितले.पोलिस तपास व कारवाई: पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, घटनेची सखोल चौकशी सुरू असून, संबंधितांच्या जबाब नोंदवले जात आहेत. शाळेच्या कर्मचाऱ्यांची व प्रशासनाचीचौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.नागरिकां तहमध्ये चिंता:शाळेसारख्या सुरक्षित ठिकाणी अन्नातून विषबाधा होणे हे चिंताजनक असून, भविष्यात अशी घटना पुन्हा होऊ नये यासाठी कडक उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Post a Comment
0 Comments