श्री जगदंबा माता गोरक्षण सिद्ध पीठ चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा संचालित गायत्री गो सेवा धाम व गो विज्ञान केंद्र किन्ही नाईक,ता,चिखली जिल्हा बुलडाणा,येथील गोशाळेची आत्मनिर्भर ते कडे वाटचाल -
(चिखली तालुंका प्रतीनीधी)
महारास्ट्र गोसेवा आयोगाच्या माध्यमातून व सूक्ष्म लघु मध्यम उद्यम मंत्रालय वर्धा येथील एम गिरी तून विनोद माऊली कोकाटे प्रशिक्षण घेवून 25 महिलांना दिला रोजगार,,, उद्धव नेरकर, गोसेवा आयोग सदस्य,
चिखली, प्रतिनिधी, कत्तलखान्यांमध्ये जाणाऱ्या गाईचे संरक्षण करण्याच्या संकल्पनेने श्री जगदंबा माता गौरक्षण सिद्ध पीठ किनी नाईक तालुका चिखली येथील विनोद माऊली कोकाटे व काही युवकांनी सात वर्षा अगोदर गोशाळे ची स्थापना केली. गेल्या सात वर्षांमध्ये अंध, अपंग ,वृद्ध, भाकड ,आणि कत्तल साठी जाणाऱ्या गाईंच्या संरक्षणासाठी गोरक्षण कार्यरत आहे , आज रोजी गोरक्षण मध्ये 127 जवळपास गोवंश सांभाळला जातो. गोशाळा स्वावलंबी करण्याच्या दृष्टिकोनातून
महारास्ट्र गोसेवा आयोगाच्या माध्यमातून सूक्ष्म लघु उद्यम मध्यम मंत्रालय अधीन महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकी संस्थान वर्धा येथून विनोद माऊली कोकाटे यांनी प्रशिक्षण घेवून गायीच्या शेन व पंचगव्य व आयुर्वेदिक जडीबुटी पासून, बनवलेल्या विविध वस्तू गोरक्षण द्वारे बनवण्यात आले आहेत यातून गावातील जवळपास 25 महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध झाला असून काही दिवसांमध्ये किनी नाईक हे गाव गाईच्या पंचगव्यापासून आणि गोमय पासून उत्पादन करणारे महाराष्ट्रातील अग्रगण्य गाव ठरू शकते हा विश्वास महारास्ट्र गोसेवा आयोगाचे अशासकीय सदस्य उद्धव नेरकर यांनी व्यक्त केला
आज दिनांक १२-१२-२०२५ रोजी एम गिरी वर्धा चे वरिष्ठ वैज्ञानिक डॉ जय किशोर छगानी , व उद्धव नेरकर यांनी भेट या महिलाशी संवाद साधत गोरक्षण द्वारा उत्पादित गोमय राखी,गोमय धूप, गोमय जपमाळ ,गोमय गणेश मूर्ती, गोमय शुभ लाभ व पिडांतक तेल, पंचगव्य साबण, पंचगव्य शंपू,गायत्री लाल दंत मंजन, गौमय हवन गौरी, फिनाईल, व घरातील सजावटीच्या गोमय वस्तू, कशा बनवल्या जातात आणि विकल्या जातात याची माहिती घेतली. अतिशय दुर्गम भागांमध्ये आणि आदिवासी विभागांमध्ये सदर गोरक्षण असून सुद्धा या गोरक्षणमार्फत बनलेल्या वस्तूंना गुजरात, उत्तराखंड ,उज्जैन, इंदोर,नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर,बीड, चंद्रपूर,राजस्थान आणि महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये , त्यांची विक्री करण्यात आली, व मागणी सुद्धा आहे.
यावर्षी गोमय राख्या हा संकल्पना घेऊन 25 महिलांनी सतत तीन महिने विविध डिझाईनच्या राख्या बनवून मार्केटमध्ये आणल्या आणि यशस्वीरित्या सदर मार्केट मधील राख्यांना अडीच लाखापर्यंत व्यवसाय मिळाला.
स्वयंपूर्ण गोशाळा करण्याच्या मानस ठेवून उभारलेल्या या प्रकल्पामध्ये संपूर्ण गावाचे सुद्धा सहकार्सय असते स्वर्गीय राजीव भाई दीक्षित यांच्या स्वप्नातील स्वयंपूर्ण गाव आणि गोआधारित अर्थव्यवस्था साकार करण्याच्या स्वप्नात छोटे मॉडेल किनी नाईक या गावांमध्ये उभारल्या जात आहे आणि त्यांच्या या कार्याला
श्रीराम खिलारे, जगन्नाथ कोकाटे,, महादेव झाटे, बाबुराव शिंदे, श्री किसन कोकाटे, राजू ठाकरे, गजानन कोकाटे, मधुकर टेकाळे, चेतन कोकाटे, महेश खानंदे,
सौ, वैशाली कोकाटे,सौ, सरुबाई झाटे, सौ,सुगंधा कोकाटे, सौ,बेबाताई शिंदे,सौ, अनिता कोकाटे, सौ, लक्ष्मी शेंबेकर, विमल कोकाटे, सौ, संगीता शिंदे, सौ, रेणुका ठाकरे, पडघान आजी, व बनाबाई कोकाटे, व गावकरी यांचे नेहमी सहकार्य असते,
देशी गोवंश वाचला पाहिजे , म्हणून सगळ्यांनी या कार्यात सहकार्य करावे, असे आव्हान श्री विनोद माऊली कोकाटे यांनी केले,
गोसेवा आयोग व महात्मा गांधी ग्रामीण औद्योगीकरण संस्थान (एमगिरी) वर्धा,यांचे गोशाळा व गावकरी यांचे वतीनी आभार सुद्धा मान्यता आले,

Post a Comment
0 Comments