Type Here to Get Search Results !

रोहिणखेड येथे राजमाता जिजाऊ जयंती मोठ्या उत्साहात साजरी*

  (मोताळा प्रतीनिधी संभाजी हाडे)      *रोहिणखेड येथे राजमाता जिजाऊ जयंती मोठ्या उत्साहात साजरी* 





रोहिणखेड ता.13 जानेवारी 

शिवशंभु मर्दानी आखाडा रोहीणखेड तर्फे आयोजित राजमाता जिजाऊ जयंती आणि स्वामी विवेकानंद जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली गावातील मुलींनी राजमाता जिजाऊ यांची व्यक्तिरेखा साकारली . जिजाऊ जयंती निमित्त शिवशंभु मर्दानी आखाड्यातर्फे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये प्रमुख व्याख्याते म्हणून शिवव्याख्याते डॉ. गायत्री प्रकाश सावजी यांनी व्याख्यान दिले आदर्श माता राजमाता व विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला डॉक्टर सावजी यांनी आपल्या भाषणातून राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला संपूर्ण गावकऱ्यांनी कार्यक्रमांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी सरपंच रमेश शेठ ऐन्डोले तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य किन्होळकर सर होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुरुषोत्तम सराग सर यांनी केले तर आभार प्रदर्शन शिवशंभू मर्दानी आखाड्याचे संस्थापक अध्यक्ष संभाजी हाडे  यांनी केले

Post a Comment

0 Comments