Type Here to Get Search Results !

बोगस लाभार्थ्यांना शेती वाटप शेलोडी येथील नागरिकांचे उपोषण

 बोगस लाभार्थ्यांना शेती वाटप शेलोडी येथील नागरिकांचे उपोषण



कर्मवीर दादासाहेब

गायकवाड शेती

सबलीकरण योजनेअंतर्गत

शेलोडी येथील वाटप

केलेल्या बोगस शेती लाभार्थ्याविरुध्द करण्यात आलेली शेतीची नोंद रद्द करण्यात यावी यासाठी शेलोडी येथील नागरिकांनी आमरण उपोषण सुरु केले आहे.

स्थानिक उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आज २० जानेवारी पासून आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे. शेलोडी येथील लाभार्थी दिलीप मोहाडे, धर्मराज मोहाडे

,

हे सख्खे भाऊ असून त्यांना समाज कल्याण विभागाने उपरोक्त योजनेअंतर्गत शेतीचा लाभ दिला. विशेष म्हणजे

त्यांच्या आईच्या नावाने पातूर येथे शेती आहे. ती शेती विक्री केली आहे. तसेच राजू तायडे, संजय तायडे यांच्या नावे सुध्दा असलेल्या शेतीचा त्यांनी हक्क सोडला आहे व ती शेती ताराबाई राठी यांना विक्री केली आहे. राजू व संजय यांनी संगनमत करुन दादासाहेब योजनेअंतर्गत शेतीचा लाभ घेतला आहे. याबाबत चौकशी व्हावी यासाठी हरीष इंगळे, संघपाल इंगळे, गणेश नाईक, सदानंद इंगळे व कडूबा इंगळे यांनी उपोषण सुरु केले आहे.

Post a Comment

0 Comments