Type Here to Get Search Results !

जळगाव जिल्ह्यात काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमानात वाढ होऊन थंडीचा कडाका कमी

 मुक्ताईनगर प्रतिनिधी:- जळगाव:- जळगाव जिल्ह्यात काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमानात वाढ होऊन थंडीचा कडाका कमी झाला होता. मागील दोन दिवसापासून थंड वाऱ्यामुळे पहाटे आणि रात्री थंडी काहीशी वाढली होती. मात्र दुपारचा उन्हाचा चटका कायम होता दरम्यान आज पासून थंडी पुन्हा वाढणार आहे 19 ते 24 जानेवारी दरम्यान पहाटे थंडीचा जोर किमान तापमान 12 ते 14 डिग्री सेल्सियस दरम्यान राहण्याची शक्यता आहे 23 जानेवारी पर्यंत कमाल तापमान 32 ते 33 डिग्री सेल्सियस दरम्यान राहील.त्यामुळे दुपारच्या वेळेस काहीसा उकाडा जाणवेल अशी माहिती हवामान अभ्यासात यांनी दिली .अरबी समुद्रामध्ये केरळच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. उत्तर भारतात वेगाने वारे वाहत आहेत. उत्तरेकडील राज्यामध्ये बर्फ वृष्टीमुळे तापमानात घट होऊन थंडीत वाढ होत आहे.

Post a Comment

0 Comments