*वृद्ध मृत आजीबाईची ओळख पटविण्याचे आवाहन*
खामगांव :- आज दिनांक 9 जानेवारी 2025 रोजी खामगांव येथील नगर परिषद लगत नवीन मोठ्या नाट्यगृह इमारतीचे काम सुरू आहे आज पहाटे सकाळी मागून खाऊन आपला उदर निर्वाह करणारी बेवारस वृद्ध आजीबाई ही मृत अवस्थेत पडलेली होती घटनेची माहिती एकनिष्ठा गौ - सेवा रक्तसेवा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष सुरजभैय्या यादव , यांना मिळताच त्यांनी शहर पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार मा. राजु पवार साहेब यांना फोनद्वारे माहिती दिली व लगेच आपले सहकारी बुलढाणा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सिद्धेश्वर निर्मळ, यांच्या आटो रिक्षा मध्ये मृत अवस्थेत पडलेल्या आजीबाईला शहर अध्यक्ष प्रदीप शमी , शिवा अटरावलकर यांच्या सहकार्याने नेले. तसेच बेवारस वृद्ध आजीबाईचा शव सामान्य रुग्णालय येथे ठेवण्यात आलेला आहे तिच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचा प्रयत्न एकनिष्ठा फाउंडेशन कडून सुरू आहे.
संपर्क सुरजभैय्या यादव 7020866278 खामगांव जिल्हा बुलढाणा यांना संपर्क करावा असे आवाहन सुद्धा करण्यात आलेले आहे.
टिप :- ध्रुपताबाई राहणार सखाराम संस्थान जिल्हा वाशिम अशी माहिती मिळालेली आहे ही माहिती खरी आहे की खोटी याची विचारपूस करून कळविण्यात येईल.

Post a Comment
0 Comments