Type Here to Get Search Results !

लोणवडी लघु पाटबंधारे प्रकल्प बाधित खडदगाव येथील शेत रस्त्यावर पूल बांधकामाकरिता आवश्यक निधी उपलब्ध करून द्या - आमदार चैनसुख संचेती यांची निवेदनाद्वारे मागणी*

 *लोणवडी लघु पाटबंधारे प्रकल्प बाधित खडदगाव येथील शेत रस्त्यावर पूल बांधकामाकरिता आवश्यक निधी उपलब्ध करून द्या - आमदार चैनसुख संचेती यांची निवेदनाद्वारे मागणी*



नांदुरा:(प्रफुल्ल बिचारे):-

    कित्येक वर्षे झाली प्रलंबित असलेल्या लोणवडी लघु पाटबंधारे योजना या प्रकल्पातील बुडीत क्षेत्रातील खळदगाव येथील शेतरस्ता पाण्याखाली जात असल्यामुळे त्या ठिकाणी पुलाच्या बांधकामा करिता आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी मलकापूर मतदारसंघाचे विद्यमान आमदार श्री चैनसुखजी संचेती यांनी  कार्यकारी संचालक विदर्भ पाटबंधारे विभाग नागपूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

         या रस्त्यावर खळदगाव येथील अनेक शेतकऱ्यांची शेत जमीन असून त्यांना शेती करण्यासाठी त्याचप्रमाणे शाळेतील विद्यार्थ्यांना ये - जा करण्यासाठी खूप नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्रकल्प बाधित नाल्यावर लवकरात लवकर पूल बांधणे आवश्यक आहे, यासाठी  पूलाच्या बांधकामाकरिता १५३ लक्ष रुपये ची आवश्यकता असून तो निधी लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी मलकापूर मतदारसंघाचे विद्यमान आणि लोकप्रिय आमदार श्री चैनसुख संचेती यांनी विदर्भ पाटबंधारे विभाग नागपूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.  

     निवेदना मध्ये लोणवडी लघु पाटबंधारे योजना ता. नांदुरा जि. बुलडाणा या प्रकल्पातील बुडीत क्षेत्रातील खडदगांव येथील शेतरस्ता पाण्याखाली जात असल्याने शेतकऱ्यांना तसेच शाळकरी मुलांना ये-जा करण्याकरीता अडचण होत असून बुडीत क्षेत्रातील नाल्यामध्ये पुलाच्या बांधकामाकरीता १५३ लक्ष रुपयांचा निधी आवश्यक आहे

     तरी लोणवडी लघु पाटबंधारे योजना ता. नांदुरा जि. बुलडाणा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील नाल्यामध्ये पुलाच्या बांधकामा मंजूरी प्रदान करून निधी उपलब्ध करुन देण्यात यावा. अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी मलकापूर नांदुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार चैनसुख संचेती, खळदगाव चे माजी सरपंच श्री महादेवराव पाटील आणि खळदगावचे विद्यमान सरपंच श्री प्रवीण महादेवराव पाटील उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments